Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | Dhananjay Munde यांच्याकडून Raj Thackeray यांचा 'अर्धवटराव' उल्लेख !-tv9

Special Report | Dhananjay Munde यांच्याकडून Raj Thackeray यांचा ‘अर्धवटराव’ उल्लेख !-tv9

| Updated on: Apr 20, 2022 | 10:38 PM

राज ठाकरेंनी दादर आणि ठाण्याच्या सभेतून पवारांनाच टार्गेट केलं. आणि तेव्हापासूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राज ठाकरेंना घेरण्यास सुरुवात केली..त्यातच सांगलीत परिसंवाद यात्रेच्या निमित्तानं धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी चांगलेच तुटून पडले. मंत्री धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंचा उल्लेख अर्धवट राव केलाय.

राज ठाकरेंनी दादर आणि ठाण्याच्या सभेतून पवारांनाच टार्गेट केलं. आणि तेव्हापासूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राज ठाकरेंना घेरण्यास सुरुवात केली..त्यातच सांगलीत परिसंवाद यात्रेच्या निमित्तानं धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी चांगलेच तुटून पडले. मंत्री धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंचा उल्लेख अर्धवट राव केलाय. राज ठाकरेंच्या मागे भाजपनं ईडी लावली आणि त्यामुळं लाव रे सीडी म्हणणारे कुठं आहे रे सीडी म्हणतायत, अशी बोचरी टीकाही मुंडेंनी केलीय. आता मुंडेंनी राज ठाकरेंवरच टीका केल्यानं, मनसेकडून पलटवार होणारच होता. मनसेच्या योगेश चिलेंनी धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग म्हटलंय. इकडे मनसेच्या अमेय खोपकरांनी धनंजय मुंडेंचा उल्लेख तात्या विंचू असा केलाय. हे झालं धनंजय मुंडेंचं. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनीही राज ठाकरेंना व्हिडीओ लावूनच प्रत्युत्तर दिलं. मिटकरींनी मुद्दाम राज ठाकरेंना खाज साहेब म्हटलंय.