Special Report | राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, आता करारा जवाब!-TV9
उत्तर भारतीयांची माफी मागा, नाही पाय ठेवू देणार नाही असा इशाराच बृजभूषण सिंह यांनी दिला होता. आता राज ठाकरेंनी अचानक ट्विट करुन दौरा स्थगित झाल्याची माहिती दिलीय.
अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 5 जूनचा अयोध्या दौरा स्थगित केलाय…राज ठाकरेंनी अयोध्येला येण्याची घोषणा करताच, भाजपचे खासदार बृजभूषण सिंह विरोधात उभे ठाकले होते. उत्तर भारतीयांची माफी मागा, नाही पाय ठेवू देणार नाही असा इशाराच बृजभूषण सिंह यांनी दिला होता. आता राज ठाकरेंनी अचानक ट्विट करुन दौरा स्थगित झाल्याची माहिती दिलीय. राज ठाकरेंनी लिहिलंय, की तूर्तास अयोध्या दौरा स्थगित. महाराष्ट्र सैनिकांनो या, यावर सविस्तर बोलूच. रविवार दिनांक 22 मे, सकाळी 10 वाजता. स्थळ गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दौरा स्थगित केला असला तरी, बृजभूषण सिंह माफीच्या मागणीवर ठाम आहेत..5 जूनला 5 लाख लोक अयोध्येत येणार, असा बृजभूषण सिंह दावा करतायत.
विशेष म्हणजे बृजभूषण सिंह यांच्यावर अजूनही मनसेचे नेते काहीही बोलायला तयार नाही…रविवारी राज ठाकरेच बोलतील असं प्रवक्ते सांगतायत…तर दौरा स्थगित होण्यामागं, राज ठाकरेंच्या तब्येतीचंही कारण असल्याचं बोललं जातंय. पण नक्कीच हेच कारण आहे का ?, त्यावरही बाळा नांदगावकरही स्पष्टपणे सांगत नाही आहेत. 22 जूनला पुण्यात राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आलीय..त्याचा टिझरही मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आलाय.. या टिझरमध्ये राज ठाकरेंच्या ज्या औरंगाबादच्या भाषणातील वक्तव्याचा वापर करण्यात आलाय. त्यावरुनच त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले होते..मशिदीवरील भोंग्यांवरुन, थेट इशाराच राज ठाकरेंनी सरकारला दिला होता.
त्यामुळं अयोध्या दौरा नेमका का स्थगित केला..आणि बृजभूषण सिंह यांच्यावर रविवारी राज ठाकरे काय बोलतात का ? हे दिसेलच. मात्र बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे विरोधी मोहीम सुरुच ठेवलीय..पुन्हा त्यांनी गोंडा मतदार संघात सभा घेतली. बृजभूषण सिंह यांचा वाढता विरोध पाहता, साध्वी कांचनगिरींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं आणि बृजभूषण यांना इशाराही दिला होता. तर अशा साध्वी खूप फिरतात, अशी बोचरी टीका बृजभूषण यांनी केलीय. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला…आणि इकडे शिवसेनेनं राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं. अयोध्येतला विरोध पाहता राज ठाकरेंना सहकार्य केलं असतं, असं संजय राऊत म्हणालेत. एखादी घोषणा केल्यावर राज ठाकरे माघार घेत नाहीत..पण अयोध्या दौरा स्थगित झाल्यानं, उलटसुलट चर्चाही सुरु झाल्यात…ज्याची उत्तरं रविवारच्या सभेतील मिळतील…
अयोध्येहून आनंद पांडेसह ब्युरो रिपोर्ट, tv9 मराठी