Special Report | 1 लाख कर्मचारी अंगावर आल्यास काय करणार?
एसटीच्या संपावर तोडगा काढला जावा. अरेरावीची भाषा करणे योग्य नाही. उद्या एक लाख कर्मचारी अंगावर आले तर काय कराल? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच तुमच्या हातात राज्य लोकांच्या हितासाठी दिलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे, असं सांगतानाच एसटीतील भ्रष्टाचार थांबल्याशिवाय या गोष्टी सुधारणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले होते. त्यावेळी एसटी संपाबाबत आमचा विषय निघाला होता, असं सांगतानाच एसटीच्या संपाबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिणार आहे. मुख्यमंत्री आजारी असल्याने या विषयावर त्यांच्याशी बोलणं झालं नाही, असं त्यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर संपाचं घोंगडं भिजत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. एसटीला फायद्यात आणायचं असेल तर खासगीकरण करून चालणार नाही. त्यासाठी एखादी कंपनी नेमा, असा उपाय राज ठाकरे यांनी सूचवला आहे. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकार राज ठाकरेंचा हा उपाय अवलंबणार का? याकडे सर्वांचा लक्ष लागलं आहे.