चुलीवरच्या बाबानंतर पाण्यावर तरंगणारा बाबा, ‘अंनिस’लाही दिलं चॅलेंज अन् काय घडलं?
VIDEO | चुलीवरच्या बाबानंतर आता पाण्यावर हात पाय न हलवता तरंगणारा बाबा, काय आहे प्रकार? बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : चुलीवरच्या बाबानंतर आता हिंगोलीत पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाची चर्चा आहे. हात-पाय न हलवता हे बाबा पाण्यावर बऱ्याच वेळ तंरगतात. या प्रकाराला अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आव्हान दिल्यानंतर दोघांमध्ये सामना रंगला आणि दोघेही पाण्यात उतरून तरंगू लागले. हिंगोलीत दोन दिवसांपासून पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांची चर्चा सुरु आहे. मी 24 तास पाण्यावर तरंगू शकतो. केवळ उपवास, ब्रह्मचर्य आणि नामस्मरणाच्या सामर्थ्यातून मी हे करू शकतो. मीच नव्हे तर माझी पत्नी देखील २४ तास पाण्यावर तरंगू शकते, असा दावा हिंगोलीतील हभप राठोड महाराज यांनी केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी या महाराजांना गाठलं. ते जे दावे करत आहेत, ते चमत्कार किंवा दैवी शक्ती नसून केवळ सरावाचा भाग आहे, असं वक्तव्य केलं. यावरून या बाबांनी अंनिसलाच आव्हान दिलं. मी २४ तास पाण्यावर तरंगतो, तुम्हीही तरंगून दाखवा. तसं केलं तर तुम्हाला मी गुरु मानतो, अस चॅलेंज या बाबांनी दिलं. हिंगोलीत आज अंनिसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश मगरे आणि राठोड महाराजांनी एकमेकांना दिलेलं हे आव्हान आजमावून पाहिलं आणि पुढं काय झालं बघा टिव्ही ९ मराठीचा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट