Special Report | प्रेमसंबंधातून रेखा जरेची हत्या? मुख्य सूत्रधार बाळ बोठेवर अखेर दोषारोपपत्र दाखल!
रेखा जरे आणि बाळ बोठे यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या नात्यात वारंवार वाद व्हायचे. पुढे बदनामी होऊ नये म्हणून बोठेने रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली, असं पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटलं आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड (Rekha Jare murder Case) प्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठेविरोधात (Bal Bothe) दोषारोप पत्र दाखल झालं आहे. पारनेर न्यायालयात बाळ बोठेसह आणखी सात आरोपींविरोधात पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय. साडे चारशे पानांचं हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. या दोषारोप पत्रात एक मोठा खुलासा करण्यात आलाय. प्रेम प्रकरणातून रेखा जरे यांची बाळ बोठेने हत्या केल्याचं पोलिसांनी दोषारोप पत्रात नमूद केलंय.
Published on: Jun 09, 2021 10:00 PM
Latest Videos