Special Report | कवठेमहांकाळ नगरपंचायतीत कोण जिंकणार ?
सांगली जिल्ह्यात रोहित पाटील कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रचार करत आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र आल्यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार झाली आहे. रोहित पाटील यांनी घरोघरी जाऊन प्रचार केल्यानंतर अनेकांना आबांच्या आठवणीनं गहिवरुन आलं.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर आबा अर्थात आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकवटले आहेत. सांगली जिल्ह्यात रोहित पाटील कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रचार करत आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र आल्यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार झाली आहे. रोहित पाटील यांनी घरोघरी जाऊन प्रचार केल्यानंतर अनेकांना आबांच्या आठवणीनं गहिवरुन आलं.
राष्ट्रवादी Vs महाविकास आघाडी पॅनेल
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील विरोधात महाविकास आघाडी असं चित्र आहे. कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीकडील सगळे गट महाविकास आघाडीकडे गेले आहेत. खासदार संजय काका पाटील (भाजप), घोरपडे (शिवसेना), सगरे गट (राष्ट्रवादी) आणि गजानन कोठावळे गट असे सर्व जण एकत्र येऊन महाविकास आघाडी निर्माण केली आहे. मात्र, रोहित पाटील यांनी जोरदार प्रचारानंतर विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.