Special Report | 2 शक्तिशाली देशांच्या भांडणात कोण कुणासोबत ?

Special Report | 2 शक्तिशाली देशांच्या भांडणात कोण कुणासोबत ?

| Updated on: Feb 24, 2022 | 9:49 PM

अमेरिकेनं आपण युक्रेन सोबत असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. अशावेळी अमेरिका आणि रशियासोबतही मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या भारतासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात झालीच तर कुणाच्या बाजूने उभं राहायचं असा मोठा प्रश्न भारतासमोर असणार आहे.

रशियाने यूक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर आता यूक्रेनच्या राजदूतांनी भारताला साद घातली आहे. यूक्रेनच्या राजदूतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. ‘भारत सद्यस्थितीत एक पावरफुल ग्लोबल प्लेयर बनला आहे आणि भारताने या मुद्द्यावरुन रशियाच्या राष्ट्रपतींशी चर्चा केली पाहिजे. भारत आणि रशियाचे संबंध चांगले आहेत. अशावेळी आम्हाला खात्री आहे की भारताच्या पंतप्रधानांचं म्हणणं रशियाचे राष्ट्रपती नक्की ऐकतील’, असं यूक्रेनच्या राजदूतांनी म्हटलंय.

दरम्यान, अमेरिकेनं आपण युक्रेन सोबत असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. अशावेळी अमेरिका आणि रशियासोबतही मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या भारतासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात झालीच तर कुणाच्या बाजूने उभं राहायचं असा मोठा प्रश्न भारतासमोर असणार आहे.