Special Report | Ukraine युद्धात एकटा पडला! -tv9

Special Report | Ukraine युद्धात एकटा पडला! -tv9

| Updated on: Feb 25, 2022 | 9:38 PM

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये सत्तापालटाचे संकेत दिले आहेत. पुतिन यांनी यूक्रेनच्या सैन्याला देशाची सत्ता हातात घेण्याचं आवाहन केलं आहे. रशियाने एक दिवस आधी यूक्रेनवर हल्ला चढवला आता या दोन्ही देशात भीषण युद्ध सुरु झाल्यानंतर पुतिन यांचं हे वक्तव्य आलं आहे.

मुंबई : रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनमध्ये सत्तापालटाचे संकेत दिले आहेत. पुतिन यांनी यूक्रेनच्या सैन्याला देशाची सत्ता हातात घेण्याचं आवाहन केलं आहे. रशियाने एक दिवस आधी यूक्रेनवर हल्ला चढवला आता या दोन्ही देशात भीषण युद्ध सुरु झाल्यानंतर पुतिन यांचं हे वक्तव्य आलं आहे. रशियाचे सैन्य यूक्रेनची राजधानी कीव शहरावर चाल करुन जात आहेत. रशियन सैन्याने कीव बाहेरील एका यूक्रेनी विमातळावर कब्जा केलाय. अशावेळी भीती व्यक्त केली जातेय की कीव शहरावर रशियन सैन्य ताबा मिळवेल. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी राजधानी कीवमधील विद्यमान सरकार हटवण्यास सांगितलं आहे. ‘मी पुन्हा एकदा यूक्रेनच्या सैन्यातील सैनिकांना आवाहन करतो. नव-नाझी आणि यूक्रेनी कट्टरपंथी राष्ट्रवाद्यांना आपली मुलं, बायका आणि वृद्धांना मानवी ढाल म्हणून वापर करु देऊ नका’, असं शुक्रवारी रशियाच्या सुरक्षा परिषदेत टीव्हीवर झालेल्या एका बैठकीत पुतिन म्हणाले. सत्ता तुमच्या हातात घ्या, त्यानंतर आपल्याला योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असंही पुतिन म्हणाले. तसंच यूक्रेनमध्ये रशियन सैन्य मोठी बहादुरी आणि शौर्य दाखवत आहेत, अशा शब्दात पुतिन यांनी रशियन सैन्याचं कौतुक केलं आहे.