Special Report | Miss Ukraine रॅंपवरुन थेच Russia विरोधात रणांगणात -Tv9
मी देश सोडणार नाही, आम्हाला शस्त्रास्त्र द्या, मी कोणत्याही परिस्थिती देश सोडून पळून जाणार नाही, असा कणखर पवित्रा युक्रेनच्या राजकारण्यांनी घेतला आहे. यात आता युक्रेनच्या बंदुकधारी खासदारही उतरल्या आहेत.
रशियानं यूक्रेनवर हल्ले सुरुच ठेवले आहेत. रशियानं यूक्रेनच्याकीव आणि खारकीवमध्ये हल्ला केलाय. यूक्रेनकडून रशियाला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. रशियाच्या आक्रमक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं यूक्रेनचे राष्ट्रपती वोलदीमीर झेलेंस्की यांना देश सोडण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. झेलेंस्की यांना सुरक्षितपणे देश सोडायचा असल्यास त्यांना मदत करु, असा प्रस्ताव अमेरिकेनं दिला होता. मात्र, झेलेंस्की यांनी हा प्रस्ताव नाकराल आहे. मी देश सोडणार नाही, आम्हाला शस्त्रास्त्र द्या, मी कोणत्याही परिस्थिती देश सोडून पळून जाणार नाही, असं झेलेंस्की यांनी एक व्हिडीओ जारी करुन म्हटलं आहे. झेलेंस्की यांनी देश सोडून पळ काढल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. झेलेंस्की यांनी व्हिडीओ जारी केल्यानं चर्चा थांबल्या आहेत. यात आता युक्रेनच्या बंदुकधारी खासदारही उतरल्या आहेत.