Special Report | सध्या भारताबाबत पाकिस्तानी मीडियात काय सुरुय -Tv9

Special Report | सध्या भारताबाबत पाकिस्तानी मीडियात काय सुरुय -Tv9

| Updated on: Mar 07, 2022 | 10:09 PM

ज्यादिवशी रशियानं युक्रेनविरोधात युद्ध सुरु केलं, नेमक्या त्याच दिवशी इम्रान खान रशियाच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे जगात पाकिस्तानबाबत चुकीचा संदेश गेला. त्यावरुनच पाकिस्तानी मीडियात खल रंगतोय.

ज्यादिवशी रशियानं युक्रेनविरोधात युद्ध सुरु केलं, नेमक्या त्याच दिवशी इम्रान खान रशियाच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे जगात पाकिस्तानबाबत चुकीचा संदेश गेला. त्यावरुनच पाकिस्तानी मीडियात खल रंगतोय. संयुक्त महासभेत रशियाविरुद्धच्या मतदानावेळी भारत, पाकिस्तान आणि चीन हे तिन्ही सहभागी झाले नाहीत, तिन्ही देशांनी तटस्थ भूमिका घेतली , आम्ही रशियाचेही मित्र आहोत. आणि अमेरिकेचे सुद्धा अशी भूमिका पाकिस्ताननं घेतलीय. पण तटस्थ भूमिका घेऊनही भारत आणि चीनबाबत जागतिक स्तरावर जे प्रश्न उपस्थित होत नाहीयत. तेच पाकिस्तानाबाबत का विचारले जातायत, याची त्रागा पाकिस्तानी विचारवंताच्या बोलण्यातून दिसून येतोय. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी मुलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलंय. कारण तिथल्या पाकिस्तानी दुतावासानं हात झटकले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांनाही त्रास जरुर झाला.. मात्र मागच्या काही दिवसांपासून भारत सरकारनं वेगानं भारतीयांना परत आणतंय. परराष्ट्र धोरणात कधीच कुठला देश शंभर टक्क्यांनी उत्तीर्ण होत नाही. मात्र पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाबाबत आधीच ओरड आहे. त्यात नेमकं युद्ध पुकारण्याच्या वेळेसच इम्रान खान रशियात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरुन पाकिस्तानवरचा दबाव वाढू लागलाय.