Special Report | भारताच्या तटस्थ भूमिकेमागचं कारण काय ? -tv9
रशिया आणि नाटो समूहाच्या दरम्यान असलेले मतभेद केवळ चर्चेच्या माध्यमातूनच सुटू शकतात, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतीन यांना दिला आहे. तसेच तात्काळ युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं आहे. रशिया आणि युक्रेनने चर्चेतून मार्ग काढावा. त्यासाठी प्रयत्न करावा, असं आवाहनही मोदी यांनी केलं आहे.
नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत 137 लोक ठार झाले आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तर भारतासह अनेक देशातील विद्यार्थी आणि नागरिक या दोन्ही देशात अडकून पडले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. तसेच पुतीन यांनी मोदींना युक्रेनवर हल्ला का करावा लागला याची माहिती देतानाच सध्याची परिस्थितीही अवगत केली आहे. तर मोदींनी चर्चा आणि शांततेने मार्ग काढण्याचं आवाहन मोदींनी पुतीन यांना केलं आहे. तसेच रशिया आणि नाटोमधील मतभेद प्रामाणिकपणे चर्चेने सोडवण्याचा सल्लाही मोदींनी दिला आहे. त्यामुळे पुतीन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रशिया आणि नाटो समूहाच्या दरम्यान असलेले मतभेद केवळ चर्चेच्या माध्यमातूनच सुटू शकतात, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतीन यांना दिला आहे. तसेच तात्काळ युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं आहे. रशिया आणि युक्रेनने चर्चेतून मार्ग काढावा. त्यासाठी प्रयत्न करावा, असं आवाहनही मोदी यांनी केलं आहे.