Special Report | Sadabhau Khot यांची उमेदवारी गेली अन् उधारी मागितली-tv9
उमेदवारी गेली आणि उधारी मागितली. सांगोल्याच्या दौऱ्यावर असलेल्या सदाभाऊंची आज अशी अवस्था झाली..कार्यकर्ते सदाभाऊंचं स्वागत करत होते पण या स्वागतावेळीच अशोक शिनगारे नावाचे एक हॉटेल मालक तिथे आले आणि त्यांनी सदाभाऊंना थेट उधारी मागितली.
उमेदवारी गेली आणि उधारी मागितली. सांगोल्याच्या दौऱ्यावर असलेल्या सदाभाऊंची आज अशी अवस्था झाली..कार्यकर्ते सदाभाऊंचं स्वागत करत होते पण या स्वागतावेळीच अशोक शिनगारे नावाचे एक हॉटेल मालक तिथे आले आणि त्यांनी सदाभाऊंना थेट उधारी मागितली. 2014 सालची उधारी असल्याचा दावा अशोक शिनगारेंनी केलाय. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सदाभाऊ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये भरपेट जेवण केलं. पण बिलंच दिलं नाही असा आरोप अशोक शिनगारेंचा आहे. त्यामुळं आज सांगोल्यात आलेल्या सदाभाऊंना शिनगारेंनी सर्वांच्या समोर उधारी मागितली. आता चारचौघात उधारी मागितल्यानं सदाभाऊंना काय बोलावं हेच कळेना. सदाभाऊंनी उधारी देऊ असं सांगून वेळ मारुन नेली. सदाभाऊंना उधारी मागितलेला व्हीडिओ काही वेळात व्हायरल झाला आणि त्यानंतर सदाभाऊंनी हे राष्ट्रवादीचं षडयंत्र असल्याचा आरोप केला.