Special Report | सदाभाऊ खोत यांचा ‘गेम’ होणार?-TV9
भाजपनं काल विधानपरिषदेसाठी पाच जागांची यादी जाहीर केली आणि आज चंद्रकांत पाटलांनी सहाव्या जागेवरचा उमेदवारही जाहीर करुन टाकला..प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड ही नावे कालच जाहीर झाली होती..यात आणखी एका नावाची भर पडलीय. ते नाव आहे..सदाभाऊ खोत यांचं. सदाभाऊ विधानपरिषदेची निवडणूक अपक्ष लढणार आहेत आणि भाजपनं त्यांना समर्थन जाहीर […]
भाजपनं काल विधानपरिषदेसाठी पाच जागांची यादी जाहीर केली आणि आज चंद्रकांत पाटलांनी सहाव्या जागेवरचा उमेदवारही जाहीर करुन टाकला..प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड ही नावे कालच जाहीर झाली होती..यात आणखी एका नावाची भर पडलीय. ते नाव आहे..सदाभाऊ खोत यांचं. सदाभाऊ विधानपरिषदेची निवडणूक अपक्ष लढणार आहेत आणि भाजपनं त्यांना समर्थन जाहीर केलंय. पण सदाभाऊंना पाठिंबा देण्याइतकं बळ भाजपकडे आहे का? पाचवी जागाच निवडून येण्याची शाश्वती नसताना भाजपनं सहाव्या जागीही उमेदवार का दिला असावा? भाजपला सहाही जागा जिंकून येण्याचा विश्वास आहे. महाविकास आघाडीचे आमदारही सदाभाऊंना मतदान करतील असा चंद्रकांत पाटलांना विश्वास आहे.
Published on: Jun 09, 2022 09:49 PM
Latest Videos