Special Report | संजय राऊतांवर गुन्हा दाखल, भाजपची माफीची ऑफर?

Special Report | संजय राऊतांवर गुन्हा दाखल, भाजपची माफीची ऑफर?

| Updated on: Dec 13, 2021 | 10:09 PM

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या एका आक्षेपार्ह शब्दावरुन त्यांच्याविरोधात राजनाधी दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांना खुर्ची देतानाच्या राऊतांच्या फोटोवरुन भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राऊतांनी एका आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. मात्र, त्या शब्दाचा अर्थ मूर्ख असा होत असल्याचा दावा राऊत करतात. मात्र, या शब्दप्रयोगावरुनच त्यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवार यांना संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोवरून भाजपच्या काही नेत्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते, तरी मी त्यांना खुर्ची दिली असती, असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, आपला तो बाब्या आणि दुसर्याचे ते कार्ट अशी भूमिका कायद्यासमोर चालत नाही, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरला आहे, त्यामुळे त्यांनी आता पुढे जे आहे त्याला सामोरे जायला हवे, असे अतुल भातखळकर यांनी सांगितले आहे. यांचे म्हणजे आम्ही बोलू ते धोरण आणि बांधू ते तोरण असे आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तर राऊत यांनी माफी मागावी, असंही भातखळकर म्हणाले.