Special Report | अब्दुल सत्तारांना शिवसेना स्टाईलनं समज

Special Report | अब्दुल सत्तारांना शिवसेना स्टाईलनं समज

| Updated on: Jan 05, 2022 | 11:39 PM

अब्दुल सत्तार यांच्या एका वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, शिवसेनेला भाजपशी युती करावीच लागेल, अशाही चर्चा सुरु आहेत. याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलीच तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे. भाजप-शिवसेना युतीबाबत कोण बोलतंय, कुणी प्रमुख नेता बोलतोय का, हे आधी तपासून घ्या, असे ते म्हणाले. अब्दुल सत्तार अजून शिवसेनेत नवे आहेत, त्यांची हळद आणखी उतरायची आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करत पूल बांधला तर भाजप आणि शिवसेनेची युती होऊ शकते, असं वक्तव्य करत शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, शिवसेनेला भाजपशी युती करावीच लागेल, अशाही चर्चा सुरु आहेत. याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलीच तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे. भाजप-शिवसेना युतीबाबत कोण बोलतंय, कुणी प्रमुख नेता बोलतोय का, हे आधी तपासून घ्या, असे ते म्हणाले. अब्दुल सत्तार अजून शिवसेनेत नवे आहेत, त्यांची हळद आणखी उतरायची आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत म्हणाले, ‘ हे जे मंत्री आहेत त्यांनी पक्षात 25 वर्ष पूर्ण केली तर त्यांच्या विधानाला काही अर्थ राहील, अजून त्यांच्या अंगावरची हळद उतरायची आहे बरीचशी. अजून त्यांना शिवसेनेची हळद पूर्णपणे लागायची आहे. बोलू द्या त्यांना, दुसरं कोण बोलतंय का? प्रमुख लोकांपैकी?’ तसंच पक्ष समजून घ्यायला वेळ लागतो. माझ्या सारखा माणूस जन्मताच पक्षात आहे. मला काय बोलायचं यासाठी मार्गदर्शन घ्यायची गरज पडत नाही. जे सेनेत जन्माला आले नाहीत त्यांना किमान 20 वर्ष पुढची शिवसेनेत घालवावी लागतील. मग त्यांनी सेनेतील घडामोडीविषयी बोलले पाहिजे. सत्तार कांग्रेसमधून आले आहेत. हळूहळू रुळत आहेत. लोकप्रिय होत आहेत. पण अशाप्रकारे विधान करून अकारण विरोधी पक्षाच्या हातात कोलीत मिळेल वाद निर्माण होतील असं कोणी करू नये. असं करताना कोणी दिसत नाही. आमचा सर्वांचा विश्वास उद्धव ठाकरेंवर आहे. तेच नेतृत्व राज्याला पुढे घेऊन जातील, असंही राऊत म्हणाले.