Special Report | नेत्यांची विधान ऐका...पण फक्त प्रौढांसाठी -tv9

Special Report | नेत्यांची विधान ऐका…पण फक्त प्रौढांसाठी -tv9

| Updated on: Feb 20, 2022 | 9:03 PM

पत्रकारांनी किरीट सोमय्यांनी आज के. चंद्रशेखऱ राव यांच्या भेटी संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता, किरीट सोमय्या कोण आहेत, कोण आहेत ते मला माहिती नाही. असे चुX#@ देशात भरपूर आहेत. त्यांच्या संदर्भात शिवसेनेला प्रश्न विचारू नयेत, असं संजय राऊत म्हणाले,

मुंबई : संजय राऊत यांनी आज सकाळी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या राजकारणात अनेक बदल होणार आहेत. ममता बॅनर्जी, स्टॅलिन, केसीआर, उद्धव ठाकरे यांची गैरभाजपशासित सरकार देशाच्या आगामी राजकारणाबाबत चर्चा करत आहेत. शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्याशी देखील चर्चा होईल, असं संजय राऊत म्हणाले. नव्या राजकारणाच्या स्थितीवर देश जात आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. यानंतर पत्रकारांनी किरीट सोमय्यांनी आज के. चंद्रशेखऱ राव यांच्या भेटी संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता, किरीट सोमय्या कोण आहेत, कोण आहेत ते मला माहिती नाही. असे चुX#@ देशात भरपूर आहेत. त्यांच्या संदर्भात शिवसेनेला प्रश्न विचारू नयेत, असं संजय राऊत म्हणाले 2024नंतर असे चुX#@ देशात राहणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर राजकारण लोकशाही आणि पारदर्शक असेल, असं ते म्हणाले.