Special Report | शब्दभांडार असणाऱ्या संजय राऊतांकडे दुसरा शब्द नव्हता?
पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.
शिवसेना नेते संजय राऊत यांचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खुर्ची देतानाच फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरून राऊतांना ट्रोल केलं जात आहे. भाजपच्या काही नेत्यांनीही या फोटोवरून राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यावर राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका. XXगिरी बंद करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना संतप्त प्रतिक्रिया दिली. शरद पवारच काय तिथे लालकृष्ण अडवाणी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती. पवारांचं वय, त्यांना होणारा त्रास या सर्व गोष्टी आहेत. आम्ही मांडी घालून बसतो. पवारांना वयोमानामुळे तसं बसता येत नाही. पायाचा त्रास आहे. अशावेळी पितृतुल्य व्यक्तीला खुर्ची दिली तर काय बिघडलं? हे जर कुणाला आवडलं नसेल तर ती विकृती आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादवही आले असते आणि त्यांना असा त्रास असता तर त्यांनाही मी स्वत: खुर्ची दिली असती. राजकारणात मतभेद असतील तरी हे सर्व लोक सार्वजनिक जीवनातील पितृतुल्य आहेत. ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर उभेही राहू दिले नाही, त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारू नये, असा टोलाही राऊत यांनी लगावला.