Special Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार
ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये कोळेकर कुटुंबातील 6 जणांचा समावेश होता. या एकाच कुटुंबातील 6 जणांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातारच्या पाटण तालुक्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 14 ते 16 लोक ढिगाऱ्याखाली दबले होते. या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये कोळेकर कुटुंबातील 6 जणांचा समावेश होता. या एकाच कुटुंबातील 6 जणांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्यात आल्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर एकाच चितेवर हे मृतदेह ठेवून अग्नी देण्यात आला. लहान बाळाचे मृतदेह पाहून उपस्थित नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.
Latest Videos