Special Report | Sharad Pawar यांची साक्ष, फडणवीसांवर निशाणा!-TV9

Special Report | Sharad Pawar यांची साक्ष, फडणवीसांवर निशाणा!-TV9

| Updated on: May 05, 2022 | 9:08 PM

संभाजी भिंडे आणि मिलिंद एकबोटेंना आपण ओळखत नाही, त्यांच्याबद्दल फक्त वर्तमानपत्रातच वाचलंय...अशी साक्ष शरद पवारांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगासमोर दिलीय..तसंच भीमा कोरेगावातला हिंसाचार तत्कालीन सरकारच्या गृहखात्याचं अपयश आहे, असं सांगून पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

संभाजी भिंडे आणि मिलिंद एकबोटेंना आपण ओळखत नाही, त्यांच्याबद्दल फक्त वर्तमानपत्रातच वाचलंय…अशी साक्ष शरद पवारांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगासमोर दिलीय..तसंच भीमा कोरेगावातला हिंसाचार तत्कालीन सरकारच्या गृहखात्याचं अपयश आहे, असं सांगून पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला. आयोग- शांततेच्या मार्गाने आंदोलन होत असताना कुणी तणाव निर्माण करत असेल तर जबाबदारी कुणाची ? शरद पवारांचं उत्तर, कायदा-सुव्यवस्था राखण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. असामाजिक घटकांनी शांतता भंग करु नये, आयोगाचा प्रश्न- हिंसाचाराच्या चौकशीसाठी किंवा सल्ल्यासाठी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकरांना आयोगाने बोलवायला हवं का? शरद पवारांचं उत्तर- भविष्यात दंगलसदृश्य परिस्थिती टाळण्यासाठी लोकांकडून सूचना मिळू शकतात. आयोग कोणालाही बोलावू शकतं.

Published on: May 05, 2022 09:08 PM