Special Report | ED कडून कारवाईचा सपाटा आता Sanjay Raut यांचा नंबर -Tv9

Special Report | ED कडून कारवाईचा सपाटा आता Sanjay Raut यांचा नंबर -Tv9

| Updated on: Apr 05, 2022 | 9:29 PM

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे, कारण शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि ईडीविरोधात रणशिंग फुंकणारे शिवसेना खासदार संजय यांच्या संपत्तीवर अखेर ईडीने टाच आणलीय.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे, कारण शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि ईडीविरोधात रणशिंग फुंकणारे शिवसेना खासदार संजय यांच्या संपत्तीवर अखेर ईडीने टाच आणलीय. राऊतांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय.  या घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरले म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या बड्या नेत्यावर ईडीने केलेली ही पहिलीच कारवाई आहे. या कारवाईवरून आता पुन्हा एकदा ईडी विरुद्ध शिवसेना आणि शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला आहे. या कारवाईनंतर महाविकास आघाडीतील नेत्यानी भाजपवर टीकेची झोड उडवली आहे.