Special Report | भविष्यात भाजप-शिवसेना युतीसाठी जागा कायम आहे का?
भाजपच आणि आमचं नातं 25 वर्षाचं आहे. मात्र एका व्यक्तीमुळे हे नात बिघडलं. राणे जे बोलताय ते फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार बोलू शकत नाही म्हणून त्यांनी राणेंना बोलायला पुढे केलं, असा आरोप राऊत यांनी केला. मात्र, आमच्यात हिंदुत्वाचा धागा कायम असल्याचं राऊत म्हणाले. तर दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी बोलताना भविष्यात युतीबाबत आमचे नेतेच निर्णय घेतील असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मात्र शिवसेना-भाजप युतीची शक्यता नसल्याचं म्हटलंय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन थेट नारायण राणे यांचं नाव घेऊन युतीतील बेबनावाल त्यांना जबाबदार धरलं. एकमेकांच्या कार्यालयावर हल्ला करणे उद्धव ठाकरे आणि आम्हाला आवडत नाही. भाजपच आणि आमचं नातं 25 वर्षाचं आहे. मात्र एका व्यक्तीमुळे हे नात बिघडलं. राणे जे बोलताय ते फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार बोलू शकत नाही म्हणून त्यांनी राणेंना बोलायला पुढे केलं, असा आरोप राऊत यांनी केला. मात्र, आमच्यात हिंदुत्वाचा धागा कायम असल्याचं राऊत म्हणाले. तर दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी बोलताना भविष्यात युतीबाबत आमचे नेतेच निर्णय घेतील असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मात्र शिवसेना-भाजप युतीची शक्यता नसल्याचं म्हटलंय.
Published on: Aug 28, 2021 10:01 PM
Latest Videos