Special Report | Jalgaon मध्ये Eknath Khadse यांच्याविरोधात Shivsena-BJP एकत्र? -Tv9

Special Report | Jalgaon मध्ये Eknath Khadse यांच्याविरोधात Shivsena-BJP एकत्र? -Tv9

| Updated on: Feb 18, 2022 | 10:47 PM

जळगावच्या बोदवडनगरपंचायत निवडणुकीतनगराध्यक्षपदी आनंदा पाटील तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड झाली आहे. भाजपाने शिवसेनेला साथ दिल्याने जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

जळगावच्या बोदवडनगरपंचायत निवडणुकीतनगराध्यक्षपदी आनंदा पाटील तर उपनगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची निवड झाली आहे. भाजपाने शिवसेनेला साथ दिल्याने जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलणार अशी चर्चा सुरू झाली आहे. 17  पैकी 9 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली होती. शुक्रवारी या नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदाची निवडप्रक्रिया पार पडली. यात नगराध्यक्षपदाची माळ आनंद रामदास पाटील यांच्या गळ्यात तर उपनगराध्यक्षपदी रेखा संजय गायकवाड यांची निवड झाली आहे. दरम्यान नगराध्यक्ष निवडीच्या वेळी भाजपच्या नगरसेवकाने शिवसेनेला साथ दिल्याने आगामी काळातील निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलाचे संकेत व्यक्त केले जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपाचे गिरीश महाजन, शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते.