Special Report | अब्दुल सत्तार यांचं युतीसाठी गाणं की स्वत:साठी गाऱ्हाणं ?
महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना यासंदर्भात वक्तव्य केले. ते म्हणाले, नितीन गडकरीच सेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतील. दोन व्यक्तींची मनं जुळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. युतीचा अधिकार माझ्या हातात नाही, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी सिल्लोड येथे बोलताना दिली.
भाजप आणि शिवसेना युतीचा पूल बांधण्यासंदर्भात वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आणलेल्या अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा तेच वक्तव्य केलं आहे. महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी बोलताना यासंदर्भात वक्तव्य केले. ते म्हणाले, नितीन गडकरीच सेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतील. दोन व्यक्तींची मनं जुळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. युतीचा अधिकार माझ्या हातात नाही, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी सिल्लोड येथे बोलताना दिली.
शिवसेना आणि भाजपमधील युतीसाठीचे प्रयत्न नितीन गडकरीच करू शकतील, अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. हे सांगताना त्यांनी स्पष्टीकरणही दिले. नितीन गडकरी हा माणूस मागील 30 वर्षांपासून मातोश्रीवर जात आहे. त्यामुळे मी हे वक्तव्य केलं. दोन रस्त्यांवर ते पूल बांधू शकतात तर दोन व्यक्तींची मनही जुळवू शकतात. त्यामुळे मी हे विधान केलं. मी कालही तेच विधान केलं आणि आजही करतोय, असा पुनरुच्चान अब्दुल सत्तार यांनी केलं.