Special Report | नितेश राणेंना डिवचणारे नेमके कोण ?

| Updated on: Dec 31, 2021 | 11:02 PM

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार झटका देत भाजपलं दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, या निवडणूक निकालापूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईत शिवसेनेकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्यावर नितेश राणे हरवला आहे, असा मायना लिहिण्यात आला होता. तसंच नितेश राणेंची माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस देण्यात येण्याची घोषणाही करण्यात आली होती.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर या पोस्टरबाजीवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. येत्या विधानसभेत महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येईल, आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय आम्हाला, असे सूचक विधान यावेळी नारायण राणे यांनी केले आहे. तसेच शिवसेनेवर टीका करताना राणेंनी, हे पोस्टर लावायच्याच लायकीचे आहेत, राज्याचा कारभार करण्याच्या लायकीचे नाहीत. आता एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन लावत फिरा, असा टोला राणेंनी सेनेला लगावलाय.