Special Report | भाजप आमदार नितेश राणे यांचं नेमकं काय होणार? उद्या निर्णय
न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद शांतपणे ऐकून घेतला. दरम्यान, कोर्टाची वेळ संपल्यानं या प्रकरणाचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता लागणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना खालच्या कोर्टात जाण्याचे आदेश दिले होते. तसंच त्यांना अटकेपासून संरक्षणही देण्यात आलं होतं. त्यानुसार नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या या अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली आहे.
सिंधुदुर्गातील स्थानिक शिवसेना नेते संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना अटक होणार की दिलासा मिळणार हे उद्या स्पष्ट होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आज पूर्ण झाला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद शांतपणे ऐकून घेतला. दरम्यान, कोर्टाची वेळ संपल्यानं या प्रकरणाचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता लागणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना खालच्या कोर्टात जाण्याचे आदेश दिले होते. तसंच त्यांना अटकेपासून संरक्षणही देण्यात आलं होतं. त्यानुसार नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या या अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली आहे.
नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालात सकाळपासून सुनावणीला सुरुवात झाली. सुमारे साडे पाच तास ही सुनावणी चालली. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. उद्या या प्रकरणी कुठल्याही प्रकारचा युक्तीवाद होणार नाही. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नितेश राणे या कटात सहभागी होते. त्यांच्यात सुचनेवरुन हा हल्ला झाला. त्यामुळे नितेश राणेंना आधी अटक करुन मग त्यांच्या जामीनावर सुनावणी व्हावी. तसंच नितेश राणे यांचा शरण अर्ज अद्याप देण्यात आला नाही मग ते शरण आले असं म्हणता येणार नाही, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केलाय.