Special Report | जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी
बिकट अवस्थेतही भारतीय लष्कराचे जवान लाईन ऑफ कंट्रोलवर जीवाची पर्वा न करता कडा पहारा देत आहेत. जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये लष्करी जवानांकडून स्नो स्कुटरचाही वापर केला जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनाही बर्फवृष्टीमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. जोरदार बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर तीन ते चार फुट बर्फ साचला आहे. त्यामुळे वाहतूक बंद आहे, अशावेळी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना चालत जाण्याशिवाय पर्याय नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. यात श्रीनगरमध्ये शनिवारी सकाळपासून हिमवृष्टीचा जोर वाढला आहे. याचा विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जोरदार बर्फवृष्टी आणि कमी दृश्यमानतेमुळे आज अनेक विमान उड्डाण उशीराने होत आहेत. बर्फवृष्टीचा जोर इतका वाढल की, आजूबाजूला बर्फाचा जाड थर साचला आहे. यामुळे लोकांना ये- जा करण्यास अनेक अडचणी येत आहे. हवामानातील बदलामुळे झालेल्या तुफान बर्फवृष्टीचा पर्यटकही आनंद लुटत आहेत. अशाच हवामान खात्याने 7 ते 9 जानेवारी दरम्यान जोरदार हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रेड अलर्टही जारी केला आहे.
दरम्यान, अशा बिकट अवस्थेतही भारतीय लष्कराचे जवान लाईन ऑफ कंट्रोलवर जीवाची पर्वा न करता कडा पहारा देत आहेत. जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये लष्करी जवानांकडून स्नो स्कुटरचाही वापर केला जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनाही बर्फवृष्टीमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. जोरदार बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर तीन ते चार फुट बर्फ साचला आहे. त्यामुळे वाहतूक बंद आहे, अशावेळी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना चालत जाण्याशिवाय पर्याय नाही.