Special Report | विधान परिषदेत विजय…12 आमदारांवरुन झटका !
भाजप आमदारांच्या निलंबनाला अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. तुम्ही आधी उच्च न्यायालयात का गेला नाही? असा सवाल न्यायालयाने विचारला. तसेच विधानसभेच्या ठरावाला स्थगिती देता येणार नसल्याचे सांगत 12 आमदारांनी अध्यक्षांकडे विनंती करावी अशा सूचनाही न्यायालयाने या आमदारांना दिल्या आहेत.
भाजपच्या 12 निलंबित आमदारांना आज सर्वोच्च न्यायालयात मोठा झटका बसला आहे. या आमदारांच्या निलंबनाला अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. तुम्ही आधी उच्च न्यायालयात का गेला नाही? असा सवाल न्यायालयाने विचारला. तसेच विधानसभेच्या ठरावाला स्थगिती देता येणार नसल्याचे सांगत 12 आमदारांनी अध्यक्षांकडे विनंती करावी अशा सूचनाही न्यायालयाने या आमदारांना दिल्या आहेत. जुलै महिन्यात करण्यात आलेले निलंबन 1 वर्षासाठी असल्याने न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर या आमदारांचे हिवाळी अधिवेशन हुकणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारसाठीही हिवाळी अधिवेशनात फायद्याचाच ठरणार आहे. कारण याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. तेव्हापासून ही निवडणूक घेण्याची विरोधकांची मागणी आहे. मात्र सरकारने अध्यक्षांची निवड टाळत सभागृहाचे कामकाज उपाध्यक्षांमार्फतच चालवणे पसंत केले होते.