Special Report | फक्त 15 दिवसात ओमिक्रॉन इतका का पसरला ?
दोन महिने आधीपासूनच कोरोनाची तिसरी लाट येणारच नाही या आपल्या दाव्यावर डॉ. रवी गोडसे आजही ठाम आहेत. सध्या सुरु असलेली रुग्णवाढ ही तिसरी लाट नाही, किंबहुना तिसरी लाट येणारही नाही, असंही ते म्हणत आहेत. दरम्यान, भारतातील दुसरी लाट दिवसाला चार खाल रुग्ण येण्यापर्यंत वर गेली होती. तर तिसऱ्या लाटेत दिवसाला 8 लाख रुग्ण निघण्याचा अंदाज आहे. मात्र इतक्या वेगानं ओमिक्रॉन का पसरतोय त्याचं शास्त्रिय उत्तर आता समोर आलंय.
दोन महिने आधीपासूनच कोरोनाची तिसरी लाट येणारच नाही या आपल्या दाव्यावर डॉ. रवी गोडसे आजही ठाम आहेत. सध्या सुरु असलेली रुग्णवाढ ही तिसरी लाट नाही, किंबहुना तिसरी लाट येणारही नाही, असंही ते म्हणत आहेत. दरम्यान, भारतातील दुसरी लाट दिवसाला चार लाख रुग्ण येण्यापर्यंत वर गेली होती. तर तिसऱ्या लाटेत दिवसाला 8 लाख रुग्ण निघण्याचा अंदाज आहे. मात्र इतक्या वेगानं ओमिक्रॉन का पसरतोय त्याचं शास्त्रिय उत्तर आता समोर आलंय.
ओमिक्रॉन वेगानं पसरण्याचं कारण आहे R व्हॅल्यू. आर व्हॅल्यू म्हणजे ओमिक्रॉनची बाधा झालेली एक व्यक्ती इतर किती लोकांना संक्रमित करु शकते त्यावरुन त्या व्हेरियंटची आर व्हॅल्यू काढली जाते. भारतातील सात राज्यांमधील नमुन्यांवरून जी आकडेवारी समोर आलीय ती दुसल्या लाटेहून दुप्पट आहे. लसीच्या प्रभावामुळे विषाणूतील आर व्हॅल्यू कमी असल्याचं सांगितलं जात आहे. नाहीतर ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेनं आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. त्यामुळेच ज्या राज्यात लसीकरणाचं प्रमाण जास्त आहे त्या राज्यातील नमुन्यांमधील आर व्हॅल्यूचं प्रमाण कमी आहे. ज्याचा परिणाम रुग्ण गंभीर होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे.