Special Report | नव्या वर्षात राज्यात पुन्हा लॉकडाऊनची चिन्हं ?
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढतेय. राज्यात आज 8 हजारापेक्षा अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली आहे का? असा सवाल विचारला जातोय. मात्र, त्याबाबत अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तिसरी लाट आल्याचं घोषित करुन टाकलं आहे. महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊनची स्थिती आहे. रुग्णवाढ झाली तर लॉकडाऊनशिवाय पर्यात नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

राज्यातील लोकांनी सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये कोरोनाची विस्फोटक स्थिती निर्माण होईल. कोरोना वेगाने पसरतो आहे. त्यामुळे नियंत्रण लोकांच्या हाती आहे. आपण कसं राहायचं, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नयेत हे लोकांनी ठरवायचं आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.