Special Report | Modi नावाचा गावगुंड खरंच आहे का ? Tv9 चा Reality Check

Special Report | Modi नावाचा गावगुंड खरंच आहे का ? Tv9 चा Reality Check

| Updated on: Jan 18, 2022 | 8:54 PM

पटोलेंच्या सुकळी या गावाशेजारीच हे गाव आहे. याच गावात त्यांनी विधान केलं होतं. त्यामुळे मोदी नावाचा खरंच कोणी गावगुंड सुकळीत आहे का? या गावगुंडाबाबत पटोलेंकडे ग्रामस्थांनी खरंच तक्रार केली होती का? याचा शोध घेण्यासाठी टीव्ही9 मराठीची टीम थेट भंडाऱ्यातील सुकळीत पोहोचली. तरुण ग्रामस्थांपासून ते 80 वर्षाच्या स्थानिक ग्रामस्थांबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. मोदी नावाचा गावगुंड कुठे आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’, असं वादग्रस्त विधान असलेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजपने ठिकठिकाणी आंदोलन सुरू करून पटोलेंना कोंडीत पकडलं आहे. हे सर्व प्रकरण अंगलट आल्यानंतर, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोललोच नाही. गावातील एका गावगुंडाबाबत मी ते विधान केलं आहे, अशी सारवासारव नाना पटोले यांनी केली. पण आमच्या टीमने खरंच मोदी नावाचा गावगुंड आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून जे समोर आलं, त्यावरून अनेक प्रश्नचिन्हं दिसून निर्माण झाले आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक विधान केलं. त्यानंतर त्याची सारवासारव करणारं दुसरं विधान केलं. मी मोदींबाबत बोललो नाही. गावातील मोदी नावाच्या गावगुंडाबाबत बोललो. भंडाऱ्यातील देवनाळा या गावात त्यांनी हे विधान केलं होतं. पटोलेंच्या सुकळी या गावाशेजारीच हे गाव आहे. याच गावात त्यांनी विधान केलं होतं. त्यामुळे मोदी नावाचा खरंच कोणी गावगुंड सुकळीत आहे का? या गावगुंडाबाबत पटोलेंकडे ग्रामस्थांनी खरंच तक्रार केली होती का? याचा शोध घेण्यासाठी टीव्ही9 मराठीची टीम थेट भंडाऱ्यातील सुकळीत पोहोचली. तरुण ग्रामस्थांपासून ते 80 वर्षाच्या स्थानिक ग्रामस्थांबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. मोदी नावाचा गावगुंड कुठे आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.