Special Report | उद्धव ठाकरे काहींसाठी माजी मुख्यमंत्री तर काहींसाठी पक्षप्रमुख-tv9
खुद्द एकनाथ शिंदेंनीही उद्धव ठाकरेंना ट्विटवरुन शुभेच्छा दिल्या, पण त्यांच्या ट्विटमधून पक्षप्रमुखांऐवजी फक्त माजी मुख्यमंत्री असा उल्लेख होता., यावर त्यांना प्रश्नही विचारण्यात आला., मात्र त्याचं उत्तर देणं शिंदेंनी टाळलं.
एकनाथ शिंदे गटातले काही जण अजूनही उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणतात. तर काही जण उद्धव ठाकरेंना आता शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणण्यास स्पष्टपणे नकार देतायत. शिंदे गटाच्या प्रवक्ते दीपक केसरकरांनी मागच्या काही दिवसात अनेकदा उ्दएधव ठाकरेंचा उल्लेख पक्षप्रमुख म्हणूनच केलाय., मात्र नुकतेच शिंदे गटात गेलेल्या रामदास कदमांनी उद्धव ठाकरे आता फक्त माजी मुख्यमंत्री आहेत, मी त्यांना पक्षप्रमुख म्हणणार नसल्याचं म्हटलंय. दुसरीकडे शिंदे गटातले काही जण शिवसेना आता एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं म्हणतायत., तर काही जण आजही मातोश्रीच आमची पंढरी असल्याचा दावा करतात. खुद्द एकनाथ शिंदेंनीही उद्धव ठाकरेंना ट्विटवरुन शुभेच्छा दिल्या, पण त्यांच्या ट्विटमधून पक्षप्रमुखांऐवजी फक्त माजी मुख्यमंत्री असा उल्लेख होता., यावर त्यांना प्रश्नही विचारण्यात आला., मात्र त्याचं उत्तर देणं शिंदेंनी टाळलं.