Special Report | सहकारवरुन अमित शाहांचा राष्ट्रवादीवर प्रहार

Special Report | सहकारवरुन अमित शाहांचा राष्ट्रवादीवर प्रहार

| Updated on: Dec 19, 2021 | 12:31 AM

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज प्रवरानगर येथे देशातील पहिली सहकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत बोलताना अमित शहा यांनी सहकार चळवळ मागे का पडली, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले, याविषयी जोरदार फटकेबाजी केली.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज प्रवरानगर येथे देशातील पहिली सहकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत बोलताना अमित शहा यांनी सहकार चळवळ मागे का पडली, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले, याविषयी जोरदार फटकेबाजी केली. शहा म्हणाले की, ‘ सहकार चळवळ मागे का पडली याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. आपल्यातील दोषही आपण दूर केले पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. सहकाराकरिता काहीही मदत लागली तरी नरेंद्र मोदी सरकार 24 तास तुमच्या मदतीसाठी तयार आहे, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं.

अमित शहा पुढे म्हणाले, ‘ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पूर्वी जिल्हा बँकांचं जाळं होतं. आज काय झालं कुठे गेल्या या बँका. घोटाळे का झाले. स्थिती काय आहे. केवळ तीनच उरल्या आहे. हजारो कोटीचे घोटाळे कसे झाले. हे काय रिझर्व्ह बँकेने केले का … नाही नाही… रिझर्व्ह बँकेने केले नाही. मी राजकीय भाष्य करायला आलो नाही. पण सहकारीता आंदोलनातील कार्यकर्त्यांना जरूर सांगेल सरकार तुमच्या सोबत आहे. मोदी तुमच्यासोबत आहे. सहकारीता आंदोलनावर अन्याय होणार नाही. पारदर्शकता आणली पाहिजे. व्यावसायिकता आणली पाहिजे. मुलांना सहकारीतेचा मंत्र शिकवून त्यांना या आंदोलनात सहभागी करयाला पाहिजे. नव्या नेतृत्वाकडे त्याची धुरा दिली तर पुढील 50 वर्ष ही चळवळ टिकून राहील.