Special Report | व्हीआयपींचा तामजाम, चेंगराचेंगरीचं थैमान?
जम्मूमधील कटरा येथील मंदिरात रात्री पावणेतीनच्या सुमारास ही चेंगराचेंगरी झाली. आपल्या नववर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनाने व्हावी, यासाठी संध्याकाळपासूनच येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. मात्र, सध्या कोरोनाचे निर्बंध लागू असताना इतके जण इथे कसे काय जमले, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिर परिसरात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी त्यांच्यात आपापसात वाद झाले. त्याचे पर्यवसन धक्का-बुक्कीत झाले आणि पाहता-पाहता एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरी सुरू झाली.
ऐन नववर्षाचे तांबडे फुटल्यावर जम्मूमधील कटरा येथे माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 14 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. अजूनही मदतकार्य सुरू आहे. विशेष म्हणजे माता वैष्णोदेवी यांच्या यात्रेवर बंदी होती. कोरोना निवळल्यानंतर यात्रा आयोजनाचे आदेश दिले. मात्र, इथेच घात झाला आणि नववर्षाच्या निमित्ताने देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.