Special Report | मनसे नेत्यांच्या मनात राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर संभ्रम -Tv9
माझ्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम मतदान जास्त असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत होईल असे वसंत मोरे म्हणाले आहेत.माझ्या प्रभागात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करणार आहे, कोणीही वेगळा प्रयत्न करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मनसेचे काही नेते सध्या चांगल्याच संभ्रमात आहेत, पुण्यातले वसंत मोरे राजकीय धक्क्यात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या जाहीर स्पष्टीकरणावरून तरी असेच दिसतंय, कारण माझ्या आणि साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम मतदान जास्त असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत होईल असे वसंत मोरे म्हणाले आहेत.माझ्या प्रभागात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करणार आहे, कोणीही वेगळा प्रयत्न करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे, मात्र मलाच कळेना झाले आहे की आता मी काय भूमिका घ्यावी असा मोठा संभ्रम वसंत मोरेंच्या बोलण्यातून दिसला आहे. काहीही असो पण राज ठाकरेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. आता रमजानचे दिवस आहेत त्यामुळे शांतता पाळा. मात्र मी राज ठाकरे यांच्यावर नाराज नाही, असे सांगताना काय भूमिका घ्यावी हे माला कळेना असेही ते म्हणाले आहेत.