Special Report | Anvay Naik यांच्या आत्महत्येचं प्रकरण काय? -Tv9
किरीट सोमय्या यांना माळ्याचे काम दिले तर ते त्या झाडांची तरी देखरेख करतील. माळ्याची नाही जमली तर कमीत कमी त्यांना वॉचमनची तरी नोकरी द्यावी असा टोला अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सोमय्यांना लगावला आहे.
मुंबई : अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणावरून पुन्हा एकदा अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर हाच सर्वात पुढे होता, तोच सगळीकडे धावत होता. रश्मीताईंना माझी विनंती आहे की, तो आताही जमीनीच्या प्रकरणात एवढा इंटरेस्ट घेत आहे, त्याला एखाद्या माळ्याचे काम तरी मिळून द्या. माझ्या वडिलांनी लावलेली झाडे आहेत, ती आता सुकत आहेत. किरीट सोमय्या यांना माळ्याचे काम दिले तर ते त्या झाडांची तरी देखरेख करतील. माळ्याची नाही जमली तर कमीत कमी त्यांना वॉचमनची तरी नोकरी द्यावी असा टोला अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सोमय्यांना लगावला आहे. तसेच सोमय्या यांनी जमीन व्यवहारावरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जे आरोप केले आहेत, त्या आरोपांना देखील अक्षता नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.