Special Report | अणुबॉम्बच्या धमकीनं पुतीन यांनी काय साधलं? -Tv9

Special Report | अणुबॉम्बच्या धमकीनं पुतीन यांनी काय साधलं? -Tv9

| Updated on: Mar 01, 2022 | 9:48 PM

पुतिन आण्विक हल्ला करण्याची शक्यता जास्त आहे. पोलंड, मोल्डोआ आणि फिनलँड हे देश पुतिन यांचं पुढील टार्गेट असू शकतात, असंही यूलिया यांनी म्हटलंय. तर पोलंडमधील 74 टक्के लोकांचं मत आहे की पुतिन आण्विक हल्ला करु शकतात.

मुंबई : रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सुरु असलेलं हे भीषण युद्ध रोखण्यासाठी यूक्रेनसह जगभरातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, युद्ध थांबण्याचे कोणतेही संकेत अद्याप दिसून येत नाहीत. अशावेळी अजून एक मोठी बातमी समोर आलीय. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन कोणत्याही क्षणी अणूबॉम्ब टाकू शकतात, असा मोठा दावा यूक्रेनचे राष्ट्रपती बोलिदिमीर जेलेन्स्कीयांचे माजी प्रवक्ते यूलिया मंडेल यांनी केलाय. इतकंच नाही तर यूक्रेनसह अन्य देशांवरही अणुबॉम्ब हल्ला होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर पुतिन आण्विक हल्ला करण्याची शक्यता जास्त आहे. पोलंड, मोल्डोआ आणि फिनलँड हे देश पुतिन यांचं पुढील टार्गेट असू शकतात, असंही यूलिया यांनी म्हटलंय. तर पोलंडमधील 74 टक्के लोकांचं मत आहे की पुतिन आण्विक हल्ला करु शकतात.