Special Report | ठाकरे-राणे वादाचा शिवसेनेला किंवा भाजपला किती फायदा ?

Special Report | ठाकरे-राणे वादाचा शिवसेनेला किंवा भाजपला किती फायदा ?

| Updated on: Aug 25, 2021 | 11:30 PM

राणेंवरील कारवाईचा शिवसेनेला फायदा होईल की नुकसान हा मुद्दा चर्चिला जात आहे. काही जाणकारांच्या मते शिवसेनेनं स्वत:हून पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. तर काहींच्या मते नारायण राणे यांना चर्चेत ठेवणं हाच तर शिवसेनेचा छुपा अंजेडा आहे. आक्रमकता हाच राणेंचा पिंड आहे आणि अरेला कारेनं उत्तर देणं हा शिवसेनेचा स्वभाव. या दोन्ही गुणवैशिष्ट्यांमुळे राणे-ठाकरे यांच्यात कायम खडाजंगी उडते. मात्र, कालचा राडा कुणाला राडकीय नफा, नुकसान देईल यावर दावे आणि प्रतिदावे रंगत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली. त्यानंतर त्यांना जामीनही मिळाला. मात्र या कारवाईचा शिवसेनेला फायदा होईल की नुकसान हा मुद्दा चर्चिला जात आहे. काही जाणकारांच्या मते शिवसेनेनं स्वत:हून पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. तर काहींच्या मते नारायण राणे यांना चर्चेत ठेवणं हाच तर शिवसेनेचा छुपा अंजेडा आहे. आक्रमकता हाच राणेंचा पिंड आहे आणि अरेला कारेनं उत्तर देणं हा शिवसेनेचा स्वभाव. या दोन्ही गुणवैशिष्ट्यांमुळे राणे-ठाकरे यांच्यात कायम खडाजंगी उडते. मात्र, कालचा राडा कुणाला राडकीय नफा, नुकसान देईल यावर दावे आणि प्रतिदावे रंगत आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून आज नारायण राणे आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आलीय. तर नितेश राणेंसह भाजप नेत्यांकडून करारा जवाब मिलेगा असा इशारा देण्यात आला आहे.