Special Report | कसबा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची होण्यामागे कारण काय?
कसबा म्हणायला फक्त एक पोटनिवडणूक.त्याचीही मुदत फक्त वर्षभरासाठी. पण तरीही सत्ताधारी आणि विरोधकांनी या एका जागेसाठी पूर्ण झोकून दिले आहे.कसब्यात कस का लागलाय. कसबा प्रतिष्ठेची लढत का बनलीये. पाहा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी झोकून दिलं आहे. सर्व ताकद पणाला लावली आहे. मोठे-मोठे नेते पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यापासून ते उदयनराजे भोसले, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ देखील प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
दुसरीकडे विरोधकांकडून शरद पवार, नाना पटोले, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक नेते प्रचारात होते.कसब्याची एक जागा इतकी महत्वाची का आहे?
शिंदे-भाजप सरकार अस्तित्वात आल्यानंतर ही पहिली पोटनिवडणूक आहे. सत्ता कोसळल्यानंतर पहिल्यांदाच मविआ दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये एकजुटीनं लढत असल्याचं दिसतंय. टिळकांच्या घरात तिकीट न दिल्यामुळे ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंनी अपक्ष अर्ज भरलाय. स्वतः गिरीश बापट ऑक्सिजन सिलेंडर लावून प्रचारात उतरले आहेत
भाजपला पाठिंबा दिल्यामुळे मनसेचे बाळा नांदगावकर दोन दिवस कसब्यात होते. यावरच टीव्ही ९ मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट.
( राज्यातील आणि जगभरातील ताज्या बातम्या मराठीत ( Marathi News ) वाचण्यासाठी Tv9 Marathi च्या वेबसाईटला फॉलो करत राहा. महत्त्वाच्या बातम्या ( Latest Marathi news ) सर्वात आधी तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या TV9 marathi Live या Youtube चॅनेलला फॉलो करा. )