Special Report | रशिया यूक्रेनमधील युद्ध आणखी पेटणार?
युद्ध थांबवण्यासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 25 दिवसात अनेकवेळा बैठका झाल्या. मात्र युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. कारण ना रशिया एक पाऊल मागं येण्यास तयार आहे ना युक्रेन. रशियाचा विरोध डावलून नाटो देशांकडून युक्रेनला मदत सुरुच आहे. मात्र आता युक्रेनला मदत करणाऱ्या विमानांना पाडण्याचा इशारा रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलाय. रशियाला धोका पोहोचू शकतो अशा सर्व गोष्टी रशिया नेस्तनाबूत करणार असं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.
युद्ध थांबवण्यासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 25 दिवसात अनेकवेळा बैठका झाल्या. मात्र युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. कारण ना रशिया एक पाऊल मागं येण्यास तयार आहे ना युक्रेन. रशियाचा विरोध डावलून नाटो देशांकडून युक्रेनला मदत सुरुच आहे. मात्र आता युक्रेनला मदत करणाऱ्या विमानांना पाडण्याचा इशारा रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलाय. रशियाला धोका पोहोचू शकतो अशा सर्व गोष्टी रशिया नेस्तनाबूत करणार असं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे. एकीकडे रशियानं विमानं पाडण्याचा इशारा दिला असला तरी आता रशियावर हल्ल्याच्या भीतीनं रशियात वास्तव्याला असलेले गर्भश्रीमंत VVIP व्यक्ती रशिया सोडून जात आहेत का असा सवाल उपस्थित झालाय.
गेल्या गुरुवारपासून रशियामधून कित्येक प्रायव्हेट जेट्सनी दुबई आणि इतर सुरक्षित ठिकाणांकडे उड्डाण घेतलंय. VVIP व्यक्तींनी रशिया सोडण्यामागे हल्ल्यांची भीती हे कारण आहे का? काही प्रायव्हेट विमाने रशियाच्याच युराल डोंगररांगांमध्ये उतरल्याची माहिती आहे. कारण युराल डोगरांमध्ये अणुबॉम्बच्या हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी रशियाने बंकर तयार केले आहेत.
रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या मारिओपोल शहरातलं हॉस्पिटल बेचिराख झालंयं. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनला आणखी घातक शस्त्र पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. युक्रेनवर केलेल्या हल्ल्याची पुतीन यांना मोठी किंमत चुकवावी लागले असा इशाराही बायडन यांनी दिलाय.