Special Report | बाबरी कुणी पाडली ? Shivsena – BJP भिडली! -tv9
एकीकडे मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसेवरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. तर दुसरीकडे हिंदुत्ववादी राजकारणाचा भाग असलेल्या बाबरी मशिदीवरुन देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये पुन्हा एकदा दावे-प्रतिदावे सुरु झालेत.
एकीकडे मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसेवरुन महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. तर दुसरीकडे हिंदुत्ववादी राजकारणाचा भाग असलेल्या बाबरी मशिदीवरुन देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये पुन्हा एकदा दावे-प्रतिदावे सुरु झालेत. बाबरी मशिदीचा ढाच्या भाजपच्या नेत्यांनी पाडला असं म्हणत फडणवीसांनी ढाच्या पाडताना शिवसेनेचे नेते कुठं होते? असा थेट सवाल केलाय. राम मंदिरासाठी लाठ्यांचा मार खाल्ला आणि बदायुंच्या जेलमध्ये गेल्याचं म्हणत फडणवीसांनी शिवसेनेला सवाल केलेत. फडणवीसांच्या दाव्यानंतर मात्र संजय राऊतांनी शिवसैनिकांनी बाबरी पाडल्याचे पुरावेच दाखवले. 7 डिसेंबर 1992 रोजी सामनामध्ये छापून आलेल्या बातम्यांची कात्रणंच राऊतांनी ट्विट केली. शिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओच राऊतांनी ट्विट केला.