Special Report | मुख्यमंत्री शिंदेंचं कार्यालय का बंद? -tv9

| Updated on: Jul 14, 2022 | 10:42 PM

सध्या कॅबिनेटच्या बैठकाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच घेत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयातील प्रशासकीय कारभार ठप्प आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कार्यालय सुरु आहे...पण आता लवकरच एकनाथ शिंदे CMO ऑफिसही सुरु होईल ही अपेक्षा.

30 जूनला शपथविधी…7 जुलैला मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिकृत पदभार स्वीकारला. मात्र मुख्यमंत्री कार्यालयात कारभार बंद आहे. आणि त्याचं कारण आहे, मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्तीच झालेली नाही. त्यामुळं मंत्रालयातल्या 6 व्या माळ्यावरचं हे अतिशय महत्वाचं कार्यालय बंद आहे. मुख्यमंत्री कार्यालयच अजून सुरु न झाल्यानं संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधलाय. महाराष्ट्रच लॉकडाऊन मध्ये गेलाय असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. शिंदे-फडणवीस सरकारला आता 15 दिवस होत आहेत. सध्या कॅबिनेटच्या बैठकाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच घेत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयातील प्रशासकीय कारभार ठप्प आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कार्यालय सुरु आहे…पण आता लवकरच एकनाथ शिंदे CMO ऑफिसही सुरु होईल ही अपेक्षा.

Published on: Jul 14, 2022 10:42 PM