Special Report | ‘म्याव म्याव’वरुन नितेश राणेंना देवेंद्र फडणवीसांचा सल्ला
काल जेव्हा आदित्य ठाकरे विधानभवनात शिरत होते, तेव्हा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पाहून मांजरीचा आवाज काढला. इतर भाजप नेते वेगळ्या घोषणा देत होते. मात्र आदित्य ठाकरेंना पाहून नितेश राणेंनी काढलेल्या आवाजानं हश्या पिकला. सोशल मीडियात नितेश राणेंनी काढलेल्या आवाजावरुन चर्चा रंगत असतानाच नवाब मलिकांनी कोंबडा आणि मांजरीचा मॉर्फ फोटो ट्विट करुन त्यावर पहचान कौन असं शीर्षक टाकलं.

मांजरीच्या आवाजावरुन कालपासून शिवसेना आणि नितेश राणेंमध्ये खटके उडतायत. म्हणजे काल सभागृहाबाहेर नितेश राणेंनी मांजरीचा आवाजा काढला… आणि त्यानंतर सभागृहाच्या आत राणेंच्या आसन क्रमांकावरुन अनिल परबांनी त्यांना धारेवर धरलं. सध्या दोघांमध्ये खटके उडणं सुरुच आहे. ज्या नक्कलेवरुन भाजप नेत्यांनी भास्कर जाधवांना माफी मागायला लावली, ते नेते नितेश राणेंनी उडवलेल्या खिल्लीवर मात्र सावध आहेत. एरव्ही महाविकासआघाडी सरकारमधले तिन्ही पक्ष वैयक्तिक टीकेत स्वतःहून कुणी उडी घेत नाही. मात्र यावेळी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची उडवलेल्या खिल्लीवरुन नवाब मलिक मैदानात आले आहेत.