Special Session of Parliament | उद्यापासून संसदेचं विशेष अधिवेशन होणार, ‘इंडिया’चे घटक पक्ष बैठकीला हजर राहणार?
VIDEO | संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ६ वाजता सर्वपक्षीय विरोधी नेत्यांची बैठक, इंडिया आघाडीचे घटक पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे साऱ्याचे लक्ष.
मुंबई, १७ सप्टेंबर २०२३ | नवी दिल्लीत उद्या १८ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत संसदेचं विशेष अधिवेशन होणार आहे. याच संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी ६ वाजता सर्वपक्षीय विरोधी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. नवीन तयार करण्यात आलेल्या नवी दिल्लीतील संसद भवनात हे संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. तर इंडिया आघाडीचे घटक पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथील संसद भवन परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच विजय चौक परिसरात सर्वप्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. संसदेच्या परिसरात सर्वच ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात आले आहे.
Published on: Sep 17, 2023 04:36 PM
Latest Videos