Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Session of Parliament | आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन सत्र सुरु, 'या' अधिवेशनाचा अजेंडा नेमका काय?

Session of Parliament | आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन सत्र सुरु, ‘या’ अधिवेशनाचा अजेंडा नेमका काय?

| Updated on: Sep 18, 2023 | 8:19 AM

tv9 Special Report | नवी दिल्ली येथे आजपासून 18 ते 22 सप्टेंबर असे 5 दिवस चालणार संसदेचं विशेष अधिवेशन सत्र, अचानक बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात नेमकं काय घडणार? समान नागरी कायदा, एक देश-एक निवडणुकीची होणार चर्चा?

नवी दिल्ली, १८ सप्टेंबर २०२३ | आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन सत्र सुरु होतं आहे. नेमक्या कोणत्या कारणासाठी हे अधिवेशन बोलावलं गेलंय. यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झालेत तुम्हाला माहितीये का? या अधिवेशनाचा अजेंडा काय हे अद्याप माहित नसल्यानं यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. दुसरीकडे नव्या संसद इमारत परिसरात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तिरंगा फडकवला. आजच्या अधिवेशनाचं कामकाज जुन्या संसदेत होईल, त्यानंतर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेचं कामकाज नव्या इमारतीतून चालणार आहे. 18 ते 22 सप्टेंबर असे 5 दिवस संसदेचं विशेष सत्र चालेल आणि पुढच्या 4 दिवसांचं कामकाज नव्या संसदेतून होणार आहे. यावेळचं विशेष अधिवेशन हे संविधान सभेच्या स्थापनेपासून 75 वर्षांचा देशाचा प्रवास यावरच्या चर्चेसाठी बोलावण्यात आल्याचं केंद्रानं स्पष्ट केलंय. मात्र त्यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

अनेक विधेयकं या विशेष अधिवेशनात मांडली जाणार आहेत. मात्र सर्वाधिक चर्चा वन नेशन, वन इलेक्शनची आहे. वन नेशन, वन इलेक्शनद्वारे कशा प्रकारे राज्यांच्याही निवडणुका सोबत घेता येतील का? याबद्दलचा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे.

Published on: Sep 18, 2023 08:18 AM