Ayodhya Ram Mandir : महागड्या अलिशान जॅग्वारची एकच चर्चा,  सुरतच्या रामभक्तानं कारवरच साकारली अयोध्या....

Ayodhya Ram Mandir : महागड्या अलिशान जॅग्वारची एकच चर्चा, सुरतच्या रामभक्तानं कारवरच साकारली अयोध्या….

| Updated on: Jan 18, 2024 | 3:52 PM

गुजरातच्या सुरतमधील एका रामभक्त रहिवासी सिध्दार्थ दोषी याने त्याच्या सर्वात महागड्या आणि अलिशान जॅग्वार कारवर थेट अयोध्याच साकारली आहे. या कारवर प्रभू श्रीरामांच पेंटिंग, राम मंदिराची प्रतिकृती, भगवे झेंडे आणि पणत्या अशी सजावट केली आहे.

अयोध्या, 18 जानेवारी 2024 | अयोध्येत 22 जानेवारी ला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अवघ्या देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. जितकं ज्याला जमेल तितकं तो काही ना काही करायचा प्रयत्न करीत आहेत. कोणी पुस्तकांपासून राम मंदिराची प्रतिकृती साकारत आहे. तर कोणी बिस्कीटांचा वापर करून राम मंदिर बनवत आहेत. अशातचं आता गुजरातच्या सुरतमधील एका रामभक्त रहिवासी सिध्दार्थ दोषी याने त्याच्या सर्वात महागड्या आणि अलिशान जॅग्वार कारवर थेट अयोध्याच साकारली आहे. या कारवर प्रभू श्रीरामांच पेंटिंग, राम मंदिराची प्रतिकृती, भगवे झेंडे आणि पणत्या अशी सजावट केली आहे. गुजरात सूरतमधून ही कार थेट अयोध्येत दाखल झाली आहे. सिद्धार्थ दोषी या राम भक्तांनं असं म्हटलं की, मी भारतगौरव यात्रा करत असतो. तसेच मी 75वा आजादी अमृत महोत्सव, चंद्रयान आणि आता अयोध्येत प्रभू श्री रामाचा होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा…या महत्त्वाच्या क्षणांचा साक्षीदार होण्याचं मला भाग्य मिळालं म्हणून मी ही माझी कार प्रभू श्रीराम यांच्या प्रतिकृतीने सजवण्याचा प्रयत्न केला आहे.

Published on: Jan 18, 2024 03:52 PM