MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 28 October 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 28 October 2021

| Updated on: Oct 28, 2021 | 7:03 PM

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या वकिलांनी तब्बल तीन दिवस जोरदार युक्तिवाद केल्यानंतर अखेर आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मिळाला आहे. त्यामुळे तब्बल 25 दिवसानंतर उद्या किंवा परवा शनिवारी आर्यन तुरुंगाबाहेर येईल.

गेल्या 25 दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे.

आज सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.