नादच खुळा! शाहरुख खानच्या 'पठाण'साठी पठ्ठ्यानं केलं अख्खं थिएटर बुक

नादच खुळा! शाहरुख खानच्या ‘पठाण’साठी पठ्ठ्यानं केलं अख्खं थिएटर बुक

| Updated on: Jan 23, 2023 | 11:04 AM

पठाण चित्रपट जितका वादात सापडलाय तितकीच त्याला चाहत्यांची मिळतेय पसंती... कोणी आणि कुठे झालं संपूर्ण ऑडिटोरियम बुक?

अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण असा स्टारर पठाण चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदर्शनाला अवघे दोन दिवस बाकी असताना या चित्रपटाच्या विरोधात वाद पेटला आहे. पठाण हा जितका वादात सापडला तितकीच त्याला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाहरुख खानचे चाहते या पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी ऍडव्हान्स बुकींग करत आहेत. सांगली शहरातील शाहरुख खानच्या चाहत्यांनी तर फर्स्ट दे फर्स्ट शोचा संपूर्ण थिएटरच बुक केले असल्याची माहिती शाहरुख खानचे चाहते वसीम तांबोळी आणि मोईम अलासे यांनी दिली आहे. सांगलीतील विजयनगरमधील औरम सिनेमा थिएटरमध्ये हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सकाळी साडे नऊच्या शोसाठी एसआरके युविव्हर्स या फॅन क्लबनं अख्खं ऑडिटोरियम बुक केलं आहे. ट्विटर हॅण्डलवर ही माहिती शेअर होताच शाहरुख खानने देखील चाहत्यांचे आभार मानत तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Jan 23, 2023 10:55 AM