आजपासून एसटीची भाडेवाढ
आजपासून एसटीची भाडेवाढ झाली . मात्र तिकीट मशिन अपडेट न झाल्याने त्यावर तिकीटांचे जुनेच दर आहेत. रात्री हॅाल्टिंगला असलेल्या बसेसच्या मशीन अपडेट झाल्याच नाहीत, त्यामुळे कंडक्टरला मॅन्यूअली जुन्या पद्धतीनं छापलेल्या तिकीट द्याव्या लागत आहेत.
मुंबई : तिकीट मशिन अपडेट न झाल्याने त्यावर तिकीटांचे जुनेच दर आहेत. रात्री हॅाल्टिंगला असलेल्या बसेसच्या मशीन अपडेट झाल्याच नाहीत, त्यामुळे कंडक्टरला मॅन्यूअली जुन्या पद्धतीनं छापलेल्या तिकीट द्याव्या लागत आहेत. ज्या बसेसमध्ये छापील तिकीट उपलब्ध नाही, अशा कंडक्टरला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. नागपूर बसस्टॅापवर १०० च्या वर बसेस काल रात्री मुक्कामाने आल्याय, त्यांच्या तिकीट मशिन्स अपडेल्या झाल्या नाहीत. राज्यातील अनेक बस स्टॅापवर हॅाल्टिंगला आलेल्या बसेसबाबत हिच अडचण आहेत. तीन वर्षानंतर एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ झालीय, याचा प्रवाशांनाही शॅाक तर लागलाच, पण मशिन अपडेट न झाल्याने कंडक्टरलाही मनस्ताप सहन करावा लागतोय. नागपूरच्या गणेशपेठ बस स्टॅापवर याचा आढावा घेतला, आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी.
Published on: Oct 26, 2021 10:59 AM
Latest Videos