शिवनेरीतली सुंदरी हसली पण लालपरी रुसली? MSRTC च्या नव्या निर्णयावर एसटी कर्मचारी काय म्हणताय?
मुंबई-पुणे शिवनेरी बसमध्ये आता विमानातील हवाई सुंदरींप्रमाणे शिवनेरीतही सुंदरी नेमण्याचा निर्णय झाला. यावरून सुंदरी नेमण्याबरोबर लालापरीची स्थिती कधी सुधारणार? असा सवालसध्या केला जात आहे.
विमानातील हवाई सुंदरींप्रमाणे शिवनेरी बसमध्येही सुंदरी असणारी आहे. नवनियुक्त एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी हा निर्णय घेतला. मुंबई-पुणे शिवनेरी बसमध्ये आता सुंदरी दिसणार आहे. प्रवाशांना येणाऱ्या अडचणी आणि येणाऱ्या थांब्यांची माहिती अशा विविध गोष्टींची जबाबदारी या सुंदरींना देण्यात येणार आहे. मात्र आता या निर्णयाला विरोधकांकडून टीका होतेय. कारण विमानाला आकाशात थांबे नसतात, विमानात जेवणासह नाश्ता दिला जातो. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर माहिती देणारे लोक लागतात. टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी सीटबेल्ट बांधण्यापासून अनेक सूचना दिल्या जातात या सर्वांची जबाबदारी हवाई सुंदरींची असते. मात्र शिवनेरी बसला अनेक थांबे आहेत. नाश्ता व जेवणासाठी बस थांबवली जाते, ऑक्सिजन वा सीट बेल्टचा विषयच येत नाही. त्यामुळे शिवनेरीत सुंदरी नेमण्याऐवजी बस कंडक्टर हेच खरे महामंडळाचे सुंदरी आहेत. त्याऐवजी लालपरीच्या सुंदरतेकडे लक्ष द्या अशी मागणी केली जात आहे.