ST Employee Strike | एसटीचं विलीनीकरण झालंच पाहिजे अन्यथा संप चालू ठेवणार : कर्मचारी

ST Employee Strike | एसटीचं विलीनीकरण झालंच पाहिजे अन्यथा संप चालू ठेवणार : कर्मचारी

| Updated on: Nov 24, 2021 | 6:49 PM

एसटी कर्मचाऱ्याचा पगार किमान 5 हजार तर कमाल 21 हजार करण्याचा प्रस्ताव सरकारनं ठेवल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय.

एसटी कर्मचाऱ्याचा पगार किमान 5 हजार तर कमाल 21 हजार करण्याचा प्रस्ताव सरकारनं ठेवल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिलीय. गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. गेल्या 15 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत एसटी कर्माचारी आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. एसटीच्या विलीनीकरणावरून सध्या जोरदार राजकारण तापलंय. एसटीच्या विलीनीकरणाची मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतेय, तर इतर महामंडळांचंही विलीनीकरण लागेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीय. विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे त्यावर बोलणार नाही असंही शरद पवार म्हणाले. एसटीचं विलीनीकरण झालंच पाहिजे अन्यथा संप चालू ठेवणार, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Published on: Nov 24, 2021 06:34 PM